RBI Monetary Policy Update: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरबीआयकडून सकाळी 10 वाजता क्रेडिट पॉलिसीची घोषणा होणार आहे. व्याजाचे दर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता आहे.  विकासाचा वेग राखण्यासाठी सोबतच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नाही.  रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील बदल अपेक्षित नाहीत. सलग 11 व्यांदा कोणतेच बदल बघायला मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.5 टक्क्यांवर आहे. 


आज जाहीर होणारे पतधोरण या आर्थिक वर्षातील पहिलेच पतधोरण


आज जाहीर होणारे पतधोरण हे या आर्थिक वर्षातील पहिलेच पतधोरण असेल. अर्थतज्ज्ञांच्या मते, आरबीआय या वेळीही आपल्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ करण्याची शक्यता नाही. सध्याचा महागाई दर पाहता आरबीआयकडून इन्फ्लेशनच्या आपल्या अंदाजात वाढ करण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेल, इंधन, भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. 


रिझर्व्ह बँकेने सलग 10 वेळा व्याज दरात कोणताही बदल केला नाही. सध्या रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये  जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला होता. 


रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 



महत्त्वाच्या बातम्या: