एक्स्प्लोर

RBI : आरबीआयची विशेष बैठक संपन्न, महागाई नियंत्रणात का नाही याचा अहवाल सरकारला देणार

Inflation : सलग तिसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या खाली ठेवण्यात आरबीआयला अपयश आलं आहे, आता त्यासंबंधी अहवाल देण्यात येणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारला पाठवल्या जाणार्‍या अहवालावर चर्चा करण्यासाठी आणि अहवाल तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (RBI MPC) बैठक झाली. या वर्षी जानेवारीपासून सलग तीन तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर सहा टक्क्यांच्या समाधानकारक उंबरठ्याच्या खाली ठेवण्यात अपयश का आलं हे सांगणारा हा अहवाला असणार आहे.

अनियंत्रित महागाईवर समिती सरकारला उत्तर देईल

आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 45ZN, आरबीआय एमपीसीचे नियम 7 आणि चलनविषयक धोरण प्रक्रिया विनियम, केंद्रीय बँकांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी एमपीसीची 3 नोव्हेंबर 2022 रोजी स्वतंत्रपणे बैठक झाली. चलनविषयक धोरण प्रक्रिया विनियम, 2016 च्या तरतुदींनुसार शासनाकडे उत्तर पाठवेल.

आरबीआय सरकारला उत्तर का देण्यास का बांधिल?

आरबीआय कायद्याच्या कलमात अशी तरतूद आहे की, सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेत चलनवाढ ठेवण्यात अयशस्वी झाल्यास, मध्यवर्ती बँकेने त्याबद्दल सरकारला कळवावे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास हे या समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत, दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय एमपीसीची बैठक झाली. एमपीसीचे सर्व सदस्य ज्यात मायकेल देबब्रत पात्रा, राजीव रंजन, शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर. वर्मा यांनीही यात सहभाग घेतला होता.

2016 मध्ये MPC ची स्थापना

सहा वर्षांपूर्वी एमपीसीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच आरबीआय एक अहवाल तयार करणार आहे आणि सरकारला सादर करणार आहे. जर आरबीआय सलग नऊ महिने महागाई निर्धारित मर्यादेत ठेवण्यास सक्षम नसेल तर हा अहवाल सादर करावाच लागतो आणि म्हणून एमपीसीची स्थापना 2016 मध्ये मौद्रिक धोरण तयार करण्यासाठी एक पद्धतशीर फ्रेमवर्क म्हणून करण्यात आली होती. तेव्हापासून MPC ही धोरणात्मक व्याजदरांबाबत सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था राहिली आहे. MPC फ्रेमवर्क अंतर्गत, महागाई चार टक्क्यांच्या खाली (दोन टक्क्यांच्या फरकासह) राहील याची खात्री करण्यासाठी सरकारने आरबीआयवर ही जबाबदारी सोपवली होती.

महागाई 6 टक्क्यांच्या वर कायम आहे

मात्र, या वर्षी जानेवारीपासून महागाई सातत्याने सहा टक्क्यांच्या वरच राहिली आहे. सप्टेंबरमध्ये देखील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई 7.41 टक्के नोंदवली गेली. याचा अर्थ सलग नऊ महिन्यांपासून महागाई सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget