एक्स्प्लोर
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खराः सीबीआय

नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजेच जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा प्रकरणात कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे.
देशविरोधी घोषणांचा व्हिडीओ हा खरा असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही, असा दावा सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅबने केला आहे. सीबीआयच्या प्रयोगशाळेने दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या अहवालात हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगितलं आहे.
सीबीआयने हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. या आधारावर दिल्ली पोलिस जेएनयू प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. कन्हैया, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह 19 विद्यार्थ्यांची सीबीआयने ओळख पटवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
