Ratan Tata : भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गज, टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे भारतातील राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने (Order of Australia) सन्मानित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी फॅरेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "भारतासह ऑस्ट्रेलियासाठी रतन टाटा यांनी योगदान दिलं असून ते एक महान उद्योजक आहेत. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांबद्दल दीर्घकालीन वचनबद्धतेची दखल घेऊन रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने (AO)  सन्मानित करताना अतिशय त्यांना आनंद होत आहे."






 


यावर टाटांनी ट्विटवर लिहिलंय की, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या संबंधासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेसाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आल्याने खूप आनंदी झाला आहे.


रतन टाटा यांची मानद अधिकारी म्हणून निवड


भारतीय उद्योगपती रतन टाटांची ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक योगदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हीजनमध्ये एक मानद अधिकारी पदावरही निवड करण्यात आली आहे. टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेडचे (TPSODL) एक्सिक्युटिव्ह राहुल रंजन यांनी आपल्या लिंक्डइनवर या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये पुढे रंजन असं लिहितात की, रतन टाटा यांचं योगदान जगभर आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि दूरदृष्टीमुळे अनेकांनी आपलं ध्येय साध्य केलं आहे. तसेच रतन टाटा यांनी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांनी सामाजिक कार्यासाठी दानशूपणा दाखवला आहे.


दानशूर रतन टाटा 


रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात. याचं कारण अनेक क्षेत्रासाठी लाखो-कोटी रुपये दान करत असतात. याचा प्रत्यय कोरोना महामारीतही दिसून आला आहे. कोराना महामारीच्या काळात देश संकटात असताना त्यांनी भारत सरकारला तब्बल 1500 कोटी रुपये दान स्वरुपात दिले होते. टाटा ग्रुपकडून त्यांच्या उत्पन्नातील बुहतांश वाटा चांगल्या कार्यासाठी दान केला जात असतो.