एक्स्प्लोर

विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 66 वर्षीय संचालकाला बेड्या

अहमदाबाद : स्वतः स्थापना केलेल्या विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी जयेश पटेलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बडोदा पोलिसांनी पारुल विद्यापीठाचा संचालक असलेल्या पटेलला मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या.   बडोद्याच्या पारुल विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन दिवसांपूर्वी पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर रेप झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.   'विद्यापीठातील महिला रेक्टरच्या मदतीने पटेलने आपल्याला तीनवेळा बोलवून घेतलं. पहिल्या वेळी 15 जून रोजी त्याने मला चार तास बसवून ठेवलं. एकीकडे मला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली, तर त्याचवेळी फी माफ करण्याचं आमिषही दाखवलं.' अशी माहिती पीडितेने दिली आहे.     त्यानंतर दुसऱ्या वेळी म्हणजे 16 जून रोजी पटेलने रात्री बोलावून घेत आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा 17 तारखेला त्याने पुन्हा बोलावलं, तेव्हा हिमतीने मित्राच्या सहाय्याने बडोदा पोलिसांच्या हेल्पलाईनवर आपण तक्रार नोंदवली, असंही तिने सांगितलं.   मॉडेलचाही आरोप   मुंबईतील एका मॉडेलनेही पटेलवर छेडछाडीचा आरोप केला आहे. आपण पारुल विद्यापीठात शिक्षण घेत असताना पटेलने छेड काढली होती आणि एका हॉटेलमध्ये बलात्काराचा प्रयत्नही केला होता, असा आरोप तिने केला आहे.   कोण आहे जयेश पटेल?   66 वर्षीय जयेश पटेलने 2003 मध्ये पारुल विद्यापीठाची स्थापना केली होती. जयेश स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर असून पूर्वी दीडशे रुपयांत गर्भपात करुन देत असे. गर्भपात केंद्रं बंद झाल्यानंतर त्याने विद्यापीठाची स्थापना केली.   राजकीय क्षेत्रातही पटेलचा दबदबा आहे. 2007 आणि 2012 मध्ये जयेश पटेलने काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र शारीरिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन त्याचं निलंबन करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget