एक्स्प्लोर

एकत्रित निवडणुका खरंच दृष्टीक्षेपात आहेत?

एकत्रित निवडणुकांबद्दलच्या चर्चेसाठी मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक राष्ट्रीय सेमिनार 20 आणि 21 जानेवारीला आयोजित करण्यात आलं आहे.

  नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुकांबद्दलचा मुद्दा पंतप्रधान मोदी हे विविध व्यासपीठांवरुन मांडत असतात. याच संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठीचं एक पाऊल म्हणून मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक राष्ट्रीय सेमिनार 20 आणि 21 जानेवारीला आयोजित करण्यात आलं आहे. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, घटनातज्ज्ञ या सेमिनारला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे राज्यसभा खासदार आणि म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. सतत होणाऱ्या निवडणुकांचे काय दुष्परिणाम आहेत, एकत्रित निवडणुकांची व्यवहार्यता कितपत आहे, निवडून दिलेलं सरकार मुदतीआधीच कोसळलं तर काय, लोकसभा-विधानसभेसोबत मग स्थानिक निवडणुकापण घ्याव्यात का, इतर देशांमधे निवडणुकांचं काय मॉडेल आहे? या विषयांचं मंथन या महत्वपूर्ण सेमिनारमध्ये होणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, जेडीयूचे नेते के सी त्यागी, बीजेडी खासदार बैजयंत पांडा, ज्येष्ठ घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यासारखे दिग्गज या सेमिनारमध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व मान्यताप्राप्त पक्षांना याबाबतचं निमंत्रण पाठवलं असून त्यातल्या अनेकांनी सेमिनारमध्ये उपस्थितीस होकार दर्शवल्याचंही सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर आत्तापर्यंत काय-काय हालचाली झाल्या आहेत? एकत्रित निवडणुकांचा मुद्दा पंतप्रधान मोदींनी मांडल्यानंतर नीती आयोगानं बिबेक डेब्रॉय यांचा एक रिसर्च पेपर प्रकाशित केलेला होता. संसदेच्या एका कमिटीतही त्याच्या व्यवहार्यतेवर चर्चा झालेली आहे. शिवाय लॉ कमिशननेही आपल्या रिपोर्टमध्ये त्याला अनूकूल अशी भूमिका दर्शवलेली होती. फक्त भारतासारख्या देशात इतक्या विविध राजकीय पक्षांचं एकमत घडवून आणण्याचं महाकाय काम त्यासाठी करावं लागणार आहे. त्या दृष्टीनं मुंबईत होणारे हे राष्ट्रीय सेमिनार अत्यंत महत्वाचं असेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
Embed widget