Ayodhya Ram Mandir News : अयोध्येसह (Ayodhya) देशात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. 22 जानेवारीला भव्य राम मंदिरात (Ram Temple) रामलल्लाचा (Ram Lalla) अभिषेक (Abhishek) आणि प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर 108 फूट लांब अगरबत्ती (Agarbatti) प्रज्वलित करण्यात आली आहे. भव्य राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. रामभक्तांची तपश्चर्या पूर्ण होणार असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.


108 फूट लांब, 3500 किलो वजन 


अयोध्येसह भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊन राम नामाचा जप करत आहेत. आजपासून रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला सुरुवात झाली असून हा कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये अनेक विधी, यज्ञ केले जाणार आहेत. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त आणि अनेक प्रकारच्या भेटवस्तू अयोध्येत पोहोचत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भव्य अगरबत्तीची (Incense Stick) खूप चर्चा रंगली आहे.


प्राणप्रतिष्ठापनेसाठी भव्य अगरबत्ती


राम मंदिरासाठी खास अगरबत्ती तयार करण्यात आली असून ही अगरबत्ती सुमारे दीड महिने प्रज्वलित राहील, असं सांगण्यात येत आहे. ही खास अगरबत्ती गुजरातच्या वडोदरामध्ये तयार करण्यात आली आहे. या अगरबत्तीची लांबी 108 फूट आणि वजन 3500 किलो आहे. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होताच ही भव्य अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. 






आज 108 फूट अगरबत्ती प्रज्वलित


राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत पोहोचलेली ही 108 मीटर लांब अगरबत्ती आज पेटवण्यात आली. ही 108 मीटर लांब अगरबत्ती गुजरातच्या वडोदरा येथून अयोध्येमध्ये पोहोचली आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी सहा महिने लागले. ही अगरबत्ती अयोध्येला पोहोचल्यानंतर श्री रामभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास जी महाराज यांच्या उपस्थितीत ‘जय श्री राम’च्या जयघोषात ती प्रज्वलित करण्यात आली.


3500 किलो वजनी अगरबत्ती


गुजरातच्या वडोदरा येथे बनवलेली 108 मीटर लांबीची अगरबत्ती आज प्रज्वलित करण्यात आली आहे. या अगरबत्तीची रुंदी 3.5 फूट आहे. 1470 किलो शेण, 420 किलो जडीबुटी, 376 किलो गुग्गुलू, 376 किलो नारळाच्या शेंड्या आणि 190 किलो तूप मिसळून ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. त्याचा सुगंध अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्याचं पाहायला मिळत आहे. ही अगरबत्ती पर्यावरणपूरकरित्या तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती दीड महिना जळत राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.


देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये भेटवस्तू दाखल


अयोध्येमध्ये अनेक भेटवस्तू आल्या आहेत. आठ धातूंनी बनवलेली घंटा, सोन्याचा मुलामा असलेले शूज, कपाट, ड्रम आणि 108 मीटर लांबीची अगरबत्ती अयोध्येमध्ये पोहोचली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Mandir : अयोध्यानगरी सजली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार 'हे' विधी; पाहा संपूर्ण यादी