Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला (Ramlalla) प्रतिष्ठापना (Pran Pratishtha) सोहळा आजपासून सुरु होणार आहे. आज 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे.


22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी माहिती देत सांगितलं की, 18 जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाची मूर्ती स्थानावर ठेवली जाईल आणि 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. पत्रकार परिषदेला संबोधित करताना राय यांनी सांगितलं की, प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त वाराणसीच्या गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ठरवला होता.


प्राणप्रतिष्ठेनंतर होणार रामलल्लाचं दर्शन


हजारो मान्यवर आणि सर्व स्तरातील दिग्गज लोक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा पौष शुक्ल कूर्म द्वादशी, विक्रम संवत 2080, म्हणजेच सोमवार, 22 जानेवारी 2024 या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचं दर्शन होणार आहे. सर्वत्र रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येसह संपूर्ण भारतभर प्राणप्रतिष्ठा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 






शास्त्रोक्त प्रोटोकॉल आणि विधी :


शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने अभिजीत मुहूर्तावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्ट माहिती देताना सांगितलं आहे की, या समारंभात गणेशवार शास्त्री द्रविड आणि काशीचे प्रमुख आचार्य, लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली 121 आचार्य विधींचे निरीक्षण करतील. 


16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी औपचारिक विधी साजरे केले जातील. हे विधी पुढीलप्रमाणे आहेत.



  • 16 जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन

  • 17 जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश

  • 18 जानेवारी (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास

  • 19 जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास

  • 19 जानेवारी (संध्याकाळी) : धनाधिवास

  • 20 जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास

  • 20 जानेवारी (संध्याकाळी) : पुष्पाधिवास

  • 21 जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास

  • 21 जानेवारी (संध्याकाळी) : शैयाधिवास


पंतप्रधानांसाह दिग्गजांची उपस्थिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख श्री मोहन भागवत, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. "भारतीय अध्यात्मवादाच्या समृद्ध विविधतेचे प्रतिनिधित्व करत, हा कार्यक्रम विविध शाळा, परंपरा आणि पंथातील आचार्यांसह 50 हून अधिक आदिवासी, गिरीवासी, ताटवासी, द्विपवासी, आदिवासी परंपरांचं पालन करतील." अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.


राम मंदिर प्राणप्रतिष्ठा वेळापत्रक (Ram Mandir inauguration 2024 full schedule)



  • 16 जानेवारी 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात. त्यामुळे आजपासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील.

  • 17 जानेवारी 2024 : या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. 

  • 18 जानेवारी 2024 : या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.

  • 19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.

  • 20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल.

  • 21 जानेवारी 2024 : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला  125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल. 

  • 22 जानेवारी 2024 : या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.

  • 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Mandir : 51 इंच उंच, वजन 1.5 टन! रामलल्लाचं मनमोहक बालस्वरुप, मूर्तीची खासियत जाणून घ्या