एक्स्प्लोर

राज्यसभा निवडणूक : यूपीमध्ये भाजप 10 पैकी 9 जागांवर विजयी

यूपीमध्ये भाजपचं समर्थन असलेले अपक्ष उमेदवार अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या भीमराव आंबेडकर यांचा पराभव केला.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं. यूपीमधील पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवाचा वचपाच सत्ताधारी भाजपने काढला. उत्तर प्रदेशातील दहाव्या जागेवर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन विजयी झाल्या. जया बच्चन यांनी 38 मतांनी बाजी मारत सलग चौथ्यांदा राज्यसभेचं खासदारपद भूषवलं. यूपीमध्ये भाजपचं समर्थन असलेले अपक्ष उमेदवार अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या भीमराव आंबेडकर यांचा पराभव केला. अरुण जेटली, अनिल जैन, व्हीपीएस तोमर, अशोक बाजपेयी, एस डी राजभर, जीव्हीएल नरसिम्हा राव, कांता करदम, एच एस यादव यांनी उत्तर प्रदेशात विजय मिळवला. विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यूपीशिवाय पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांत 33 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या राज्यांमध्ये बिनविरोध निवडणूक महाराष्ट्र : महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे. बिहार : इथे सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. छत्तीसगड : इथे एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपच्या सरोज पांडे बिनविरोध निवडून आल्या. गुजरात : गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन काँग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत. हरियाणा : इथेही भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. हिमाचल प्रदेश : इथे एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली. मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली. राजस्थान : इथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली. उत्तराखंड : उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. ओदिशा : इथे तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले. इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत मोठा पक्ष निवडणुकीआधीची स्थिती  भाजप- 58 काँग्रेस- 54 निवडणुकीनंतरची स्थिती भाजप - 69 काँग्रेस - 50 - 245 सदस्यांच्या राज्यसभेत 126 हा बहुमताचा आकडा आहे. या बहुमतापासून मात्र अजून बरेच दूर - एनडीएच्या मित्रपक्षांची (टीडीपीला धरुन संख्या 17 होती) टीडीपी-6, शिवसेना-3, अकाली दल-3 पीडीपी-2 आणि काही छोटे पक्ष - एकाचवेळी ज्या 59 जागांसाठी निवडणूक झाली त्यात भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या, काँग्रेसच्या वाट्याला 10

महत्त्वाच्या बातम्या

CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Abhijeet Dipke : हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget