Rajkot International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी (27 जुलै) गुजरातमधील (Gujarat) राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Rajkot International Airport) उद्घाटन करणार आहेत. एएनआय न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी राजकोटच्या ग्रीनफिल्ड विमानतळाचं आज उद्घाटन करणार आहेत. त्यांनी बुधवारी (26 जुलै) बोलताना सांगितलं की, "हे विमानतळ खूप मोठं आणि सुंदर आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की, पंतप्रधान मोदी या विमानतळाचं उद्घाटन करतील आणि ते गुजरातच्या लोकांना समर्पित करतील."
विमानतळाचे वर्णन करताना संजीव कुमार म्हणाले की, "विमानतळाच्या बांधकामासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये खर्च आला आहे. त्याची धावपट्टी 3,000 मीटर लांब आहे, त्यामुळे मोठी विमानं येथे उतरू शकतात. भविष्यात गरज पडल्यास त्याचा विस्तार करण्यासही वाव आहे."
पंतप्रधान कार्यालयानं विमानतळाबाबत दिली 'ही' माहिती
पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, राजकोट येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे देशभरातील हवाई संपर्क सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला चालना मिळेल. त्यात म्हटलं आहे की, ग्रीनफिल्ड विमानतळ 2500 एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलं गेलं आहे. नव्या विमानतळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि टिकाऊ सुविधा आहेत.
टर्मिनल बिल्डिंग इंटीग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट (GRIHA-4) साठी ग्रीन रेटिंग आहे आणि नवी टर्मिनल बिल्डिंग (NITB) डबल इन्सुलेटेड रूफिंग सिस्टम, स्कायलाइट्स, एलईडी लायटिंग, लो हीट गेन ग्लेजिंग यासारख्या विविध टिकाऊ वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
पंतप्रधान मोदींनीच केलेली 'या' विमानतळाची पायाभरणी
पंतप्रधान कार्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, नवीन विमानतळ केवळ राजकोटमधील स्थानिक ऑटोमोबाईल उद्योगाच्या विकासास हातभार लावणार नाही तर संपूर्ण गुजरातमधील व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रांना प्रोत्साहन देईल. या विमानतळाची पायाभरणी पीएम मोदी यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2017 रोजी गुजरातमधील चोटिलाजवळील हिरासर गावात भूमिपूजन समारंभात करण्यात आली होती.
पंतप्रधानांचा राजकोट दौरा
राजकोट येथे विकसित करण्यात आलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरात हवाई वाहतुकीद्वारे संपर्क वाढवण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला मोठी चालना मिळणार आहे. अडीच हजार एकराहून अधिक क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड प्रकारच्या विमानतळाच्या उभारणीसाठी 1400 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. या नव्या विमानतळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत घटक यांचा मिलाफ करण्यात आला आहे. येथील टर्मिनल इमारत ग्रीह-4 (एकात्मिक निवास मूल्यमापनासाठी हरित मानांकन),मधील नियमांचे पालन करून तयार केली आहे तसेच नवी टर्मिनल इमारत (एनआयटीबी) दुहेरी इन्सुलेटेड छत यंत्रणा, स्कायलाईट्स, एलईडी प्रकाशयोजना, कमी उष्णता शोषणारे ग्लेझिंग यांसारख्या विविध शाश्वत घटकांसह सुसज्जित आहे. राजकोट येथे उभारण्यात आलेले हे नवे विमानतळ स्थानिक वाहन उद्योगाच्या विकासात योगदान तर देईलच त्याचबरोबर, संपूर्ण गुजरातमध्ये व्यापार,पर्यटन,शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्राला देखील चालना देईल.