27th July In History: इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्त्व आहे. भारताचे मिसाईल मॅन (Missile man Of India) अशी ज्यांची ओळख आहे त्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचे निधन आजच्याच दिवशी झालं. शास्त्रज्ञ, अभियंता, राष्ट्रपती अशी कामगिरी करणाऱ्या अब्दुल कलामांचे कार्य हे भारतातील तरूणांसाठी कायम प्रेरणादायी असेल. आजच्याच दिवशी अभिनेते अमजद खान यांचेही निधन झालं होतं. 


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 27 जुलै या तारखेला नोंदलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


1862 - अमेरिकन शहर कॅटन मध्ये हरिकेन वादळामुळे 40 हजार लोकांचा मृत्यू


1935 - चीनमधील यांग जी आणि होआंग नदीला आलेल्या पुरामुळे दोन लाख लोकांचा मृत्यू


1992 - गब्बरसिंगची भूमिका आजरामर केलेल्या अमजद खान यांचे निधन


अमजद खान (Amjad Khan) यांचा जन्म 1943 मध्ये, फाळणीपूर्वी लाहोरमध्ये झाला. भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते जयंत यांचे ते पुत्र होते. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता शोले (Sholay). या चित्रपटातील गब्बरसिंगची भूमिका आजरामर केली. आजही त्यांना या भूमिकेसाठी ओळखले जाते. 


अभिनय जगतात येण्यापूर्वी अमजद के. आसिफसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. असिस्टंट म्हणून काम करत असताना त्यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला. के. आसिफच्या लव्ह अँड गॉड नंतर अमजद खान यांनी चेतन आनंदच्या हिंदुस्तान की कसम या चित्रपटात पाकिस्तानी पायलटची भूमिका केली. या दोन्ही भूमिका अशा होत्या की त्या प्रेक्षकांच्या किंवा खुद्द अमजद खानच्याही लक्षात राहिल्या नाहीत. त्यामुळे शोले हा अमजदचा पहिला चित्रपट मानला जातो.


शोले व्यतिरिक्त अमजद खानने कुर्बानी, लव्ह स्टोरी, चरस, हम किसी से कम नहीं, इंकार, परवरिश, शतरंज के खिलाडी, देस-परदेस, दादा, गंगा की सौगंध, कसमे- वादे, मुक्कदर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लावारीस, हमारे तुम्हारे, मिस्टर नटवरलाल, सुहाग, कालिया, लेडीज टेलर, नसीब, रॉकी, यतना, सम्राट, बागवत, सत्ते पे सत्ता, जोश अशा अनेक चित्रपटात काम केलं. 


1994: नेमबाज जसपाल राणाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले


27 जुलै हा देशाच्या नेमबाजी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. याच दिवशी जसपाल राणाने 1994 मध्ये मिलान, इटली येथे झालेल्या 46व्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने विक्रमी गुण (569/600) मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.


2015 - भारताचे 11 वे राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे निधन


लोकांचा राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या डॉ. अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचं आजच्याच दिवशी निधन झालं. 27 जुलै 2015 च्या संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग येथे 'लिव्हेबल प्लॅनेट' या विषयावर व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. 


अवुल पाकीर जैनुलाउद्दीन अब्दुल कलाम असे त्यांचे पूर्ण नाव. कलाम यांना मिसाईल मॅन (Missile man Of India) आणि पीपल्स प्रेसिडेंट (People's President) म्हणूनही ओळखले जाते. ते भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध होते. जीवनात परिस्थिती कोणतीही असो, पण जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करता तेव्हा तुम्ही ती पूर्ण करत राहता असा त्यांनी संदेश दिला. अब्दुल कलाम मसूदी यांचे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्याची प्रेरणा देतात.


त्यांनी प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून चार दशके हाताळले आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि लष्करी क्षेपणास्त्र विकास प्रयत्नांमध्येही त्यांचा सहभाग होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांना भारताचा 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाते.


1974 मध्ये पहिल्या अणुबाँब चाचणीनंतर झालेल्या 1998 मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचणीमध्ये त्यांनी निर्णायक, संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. अब्दुल कलाम यांची 2002 मध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर, ते त्यांच्या शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले. त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.


ही बातमी वाचा: