Rajasthan Politics : काँग्रेसच्या (Congress) राजस्थानच्या राजकीय पक्षात सुरू असलेले संकट दूर करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या हाय कमांडने सोमवारी प्रयत्न केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि अजय माकन (Ajay Maken) या दोघांकडून लेखी अहवाल मागवला आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या बंडखोरीनंतर आता त्यांच्या काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होण्याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. गेहलोत यांनी राजस्थानमध्ये झालेल्या गदारोळासाठी माफी मागितल्याचे वृत्त आहे, मात्र काँग्रेसला 'अपमानित' केल्याने गांधी कुटुंब त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.


जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे


1-सुत्रांच्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेबद्दल माफी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी ते विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी जयपूरमध्ये होते. सूत्रांनी सांगितले की, आमदारांची बैठक आणि त्यानंतरची बंडखोरी ही 'चूक' असल्याचे सांगताना गेहलोत यांनी 'असे' व्हायला नको होते आणि याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.


2-सुत्रांच्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अशोक गेहलोत यात कोणताही सहभाग नसल्याचा दावा करत असले तरी त्यांच्या संमतीशिवाय अशी बंडखोरी होऊ शकली नसती.


3-राजस्थानचे संकट शिगेला पोहोचले असताना, आणखी एक संभाव्य उमेदवार कमलनाथ दिल्लीत पोहोचले असून ते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत. राजस्थानच्या संकटात ते मध्यस्थी करू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


4-रविवारी गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी सामूहिक राजीनाम्याची धमकी दिली होती. काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, असे आमदारांनी सांगितले होते. त्यांनी रविवारी प्रस्तावित पक्षाच्या बैठकीलाही हजेरी लावली नाही आणि अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलण्यास नकार दिला, ज्यांनी त्यांना समोरासमोर भेटण्यास सांगितले होते.


5-राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना स्पष्टपणे सांगितले होते की, ते 'देशद्रोही' नाही तर काँग्रेसच्या निष्ठावंतासाठी खुर्ची सोडतील, तूर्तास गेहलोत यांना पाठिंबा दर्शवून आणि ताकद दाखवून प्रकरण थंड ठेवायचे आहे.


6-काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय घ्यावा, असे गेहलोत समर्थकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात घाई करू नये. अशोक गेहलोत आणि त्यांचे समर्थक आमदार आता हायकमांडच्या पुढील निर्देशांची प्रतीक्षा करत आहेत.


7-राजस्थानमधील राजकीय संकट शांत करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने आता 19 ऑक्टोबरपर्यंत विधिमंडळ पक्षाची बैठक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय युद्धामुळे रविवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला.


8-गेहलोत कॅम्पची पहिली अट ही आहे की, पुढचा मुख्यमंत्री सचिन पायलट होणार नाही, असे आश्वासन पक्षाच्या हायकमांडने आमदारांना द्यावे. एवढेच नाही तर पायलटला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही नेत्याला हे पद देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. गेहलोत कॅम्पची दुसरी मागणी आहे की, गेहलोत यांच्या जागी नवा मुख्यमंत्री बनवावा, ज्यांनी दोन वर्षांपूर्वी गहलोत सरकारला वाचवले आणि सरकार पाडण्यात सहभागी असलेल्या आमदारांना नाही.


9-अशोक गेहलोत यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यावरून साशंकता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणि राजस्थानमधील सरकारचे नेतृत्व बदल यादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आता राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी उमेदवारी द्यायची की नाही. यावर आता चर्चा सुरू आहे.


10- राजस्थानचे राज्य प्रभारी अजय माकन यांनी या संपूर्ण घटनेबाबत सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संमतीनंतरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र या बैठकीला एकही आमदार आला नाही. बहुतांश आमदारांनी हायकमांडचा आदेश धुडकावून लावला आहे.


संबंधित बातम्या


Rajasthan Politics : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाहेर? दिग्विजय सिंह यांचं नाव चर्चेत