जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानात कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे आता लसही चोरीला जात आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात को-वॅक्सिनच्या 320 डोसची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात कोरोना लस चोरीची ही पहिली घटना आहे. आरोग्य विभागाने अज्ञात चोरांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे लस लगावणारं एखादं रॅकेट काम करत आहे की काय असा संशय पोलिसांना आहे. आरोग्य विभागही याची तपासणी करणार आहे.


लस चोरीच्या या घटनेमुळ खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तेव्हा लस चोरी झालेल्या ठिकाणी फक्त सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या संगनमताने ही चोरी केली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


एक कोटीहून अधिक लसीकरण करणारे राजस्थान दुसरे राज्य


सर्वाधिक लसीकरण करणारे राजस्थान हे देशातील दुसरे राज्य बनले आहे. सोमवारी दुपारपर्यंत एक कोटींहून अधिक लोकांचं राजस्थानात लसीकरण झाले आहे. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी राज्यातील एक कोटीहून अधिक लोकांना लसीकरण केल्याबद्दल  वैद्यकीय कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने लसीकरण करावं असं आवाहनही केले.


कोरोनाचा हाहाकार! केवळ 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद; हजारोंनी गमावले प्राण


गेल्या 7 दिवसांचा कोरोना चार्ट 


 


13 एप्रिल : 184372 रुग्ण, 1027 मृत्यू 
12 एप्रिल : 161736 रुग्ण, 879 मृत्यू 
11 एप्रिल : 168912 रुग्ण, 904 मृत्यू 
10 एप्रिल : 152879 रुग्ण, 839 मृत्यू 
9 एप्रिल : 145384 रुग्ण, 794 मृत्यू 
8 एप्रिल : 131968 रुग्ण, 780 मृत्यू 
7 एप्रिल : 126789 रुग्ण, 685 मृत्यू 


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.