नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. देशात दररोज दीड लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. असचं सुरु राहिलं तर हा आकडा दोन लाखांच्या पार जाऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढतच चालला आहे. अशातच देशात गेल्या 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे, नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यासोबतच देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांत 5908 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. 


गेल्या 7 दिवसांचा कोरोना चार्ट 


13 एप्रिल : 184372 रुग्ण, 1027 मृत्यू 
12 एप्रिल : 161736 रुग्ण, 879 मृत्यू 
11 एप्रिल : 168912 रुग्ण, 904 मृत्यू 
10 एप्रिल : 152879 रुग्ण, 839 मृत्यू 
9 एप्रिल : 145384 रुग्ण, 794 मृत्यू 
8 एप्रिल : 131968 रुग्ण, 780 मृत्यू 
7 एप्रिल : 126789 रुग्ण, 685 मृत्यू 


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 


आजच्या दिवसापर्यंत देशातील कोरोनाची स्थिती : 


एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 38 लाख 73 हजार 825
कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 23 लख 36 हजार 
सध्याचे सक्रिय रुग्ण : 13 लाख 65 हजार 704
एकूण मृत्यू : 1 लाख 72 हजार 85
एकूण देण्यात आलेल्या लसी : 1 कोटी 11 लाख 79 हजार 578


महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 


कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता देशभरात विविध राज्यांमध्ये कमी- जास्त स्वरुपात निर्बंध लागू करत लॉकडाऊनसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात याच धर्तीवर पुढली 15 दिवस संचारसबंदीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित करत असताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.  पुढील 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :