Rail Neer Water : मुंबईतील बहुतेक सर्वच स्टॉल्सवर, तसेच पॅन्ट्रीकारमध्ये विकल्या जाणाऱ्या रेल नीरच्या पाण्याच्या बाटल्या (Rail Neer Water) या अनेकदा ठरलेल्या किंमतीपेक्षा दुप्पटीने विकल्या जातात. अनेकदा स्टॉल्सचे विक्रेते जास्त दर आकारून प्रवाशांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. सेंट्रल रेल्वेने (Central Railway) या प्रकाराची गंभीर दखल घेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता ग्राहकांकडून जास्त रक्कम घेणाऱ्या विक्रेत्यांवर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे. 


प्रवाशांच्या होणाऱ्या फसवणुकीची गंभीर दखल घेत या संदर्भात मध्य रेल्वेने ट्वीट केले आहे. 






या ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व स्टॉल्स आणि पॅन्ट्री कार्सना फक्त ₹15/- च्या मंजूर दराने एक लिटरच्या रेल नीर (Rail Neer) पाण्याच्या बाटल्या विकायच्या आहेत. जादा शुल्क आकारले जात असल्यास, कोणत्याही स्थानकावर किंवा रेलमाड येथे ऑनलाइन तक्रार करता येईल.


रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा 


मुंबईतील रेल्वे स्थानक हा अतिशय गजबजलेला परिसर असतो. सकाळ असो किंवा रात्र रेल्वे स्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. अनेकजण दूरवरून आपल्या घरी प्रवास करतात. अशा वेळी रेल्वे स्थानकावर खरेदी करण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसतो. मात्र, याच संधीचा अनेक स्टॉल्स विक्रेते गैरफायदा घेत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेने याच कृत्यावर आक्षेप घेत ऑनलाईन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Wedding : 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान तब्बल 32 लाख विवाहसोहळे होणार; 3.75 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल, CAIT च्या सर्वेक्षणातून स्पष्ट