मुंबई: शेअर बाजारातीतल तेजी आजही कामय असून आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 234 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 85 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.39 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,185 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.47 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,202 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 428 अंकांची वाढ होऊन  तो 41,686 वर पोहोचला. 


आज बाजार बंद होताना 1994 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1465 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 185 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज बाजार बंद होताना ब्रिटानिया कंपनीच्या शेअर्समध्ये 8.81 टक्क्यांची वाढ झाली. एसबीआय, अदानी एन्टरप्रायझेस, बीपीसीएल, आयशर मोटर्स या शेअर्समध्ये वाढ झाली. तर डिविस लॅबच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचसोबत एशियन पेन्ट्स, सिपला, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 


आज शेअर बाजार बंद होताना फार्मा, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. बँक निफ्टी, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, एफएमसीजी, मेटल्स आणि एनर्जी या क्षेत्रामध्येही तेजी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 36 शेअर्समध्ये तेजी तर उर्वरित 14 शेअर्समध्ये घसरण झाली. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • Britannia 4,139.25 335.05 8.81

  • SBI 614.15 20.20 3.40

  • Adani Enterpris 3,960.60 127.35 3.32

  • BPCL 309.75 8.40 2.79

  • Eicher Motors 3,755.15 88.25 2.41


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली 



  • Divis Labs 3,414.55 -331.75 -8.86

  • Asian Paints 3,103.55 -77.80 -2.45

  • Cipla 1,130.90 -15.20 -1.33

  • Bajaj Finserv 1,778.05 -22.65 -1.26

  • Adani Ports 853.00 -9.90 -1.15



शेअर बाजाराची सुरुवात 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 237.77 अंकांच्या तेजीसह 61,188  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 94.60 अंकांनी वधारत 18,211 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 168 अंकांनी वधारत 61,119.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 61.80 अंकानी वधारत 18,178.95 अंकांवर व्यवहार करत होता.