एक्स्प्लोर

अमित शाहांना धडकी भरवणारा राहुल गांधींचा कर्नाटक दौरा

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचव्या टप्प्यात तीन आणि चार एप्रिलला शिवमोगा, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर आणि रामनगर जिल्ह्यात राहुल गांधी जाणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राहुल गांधींनी हा दौरा सुरु केला आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतल्याने लिंगायत समजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचव्या टप्प्यात तीन आणि चार एप्रिलला शिवमोगा, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर आणि रामनगर जिल्ह्यात राहुल गांधी जाणार आहेत. राहुल गांधींनी कर्नाटकात पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार येडीयुरप्पा यांच्यावरही निशाणा साधला. अमित शाह यांनी चुकून येडीयुरप्पांना नंबर वन भ्रष्टाचारी म्हटले होते. त्या विधानावरुनही राहुल गांधींनी भाजपचा समाचार घेतला. या दौऱ्यात राहुल गांधी सिद्धगंगा मठाचे शिवकुमार स्वामी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते उद्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील होलालाकेरेचा दौरा करुन, तुमकुर जिल्ह्यातील सिद्धगंगा मठात जातील. त्यानंतर दिल्लीला रवाना होण्याआधी राहुल गांधी रामनगर जिल्ह्यातील मगादीत सभा घेतील. सिद्धगंगा मठ हे लिंगायतांचं सर्वात मोठं मठ मानलं जातं. मठाचे प्रमुख संत शिवकुमार स्वामी हे रविवारी 111 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मठात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. शिवकुमार स्वामींना लिंगायत समाज ईश्वराचं रुप मानतो. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही त्यांची भेट घेतली होती. मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकारने लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने, काँग्रेसबद्दल सकारात्मक भावना लिंगायतांमध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि सिद्धगंगा मठाचे प्रमुख संत शिवकुमार स्वामी यांची नियोजित भेट महत्त्वाची मानली जाते आहे. काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. भाजपला भीती आहे की, सिद्धगंगा मठाचे अनुयायी काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे भाजपपासून दूर होऊ नयेत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी या मठाच्या प्रमुखांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, मुरुगा मठाने तर अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेसची स्तुती केली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी धाकधूक पाहायला मिळते आहे. त्यामुळे एकंदरीतच राहुल गांधी यांचा कर्नाटकमधील हा दौरा भाजपसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Embed widget