लातूर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून विदर्भातील अमरावती मतदारसंघात त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर, सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या (Praniti shinde) प्रचारासाठीही त्यांनी सभा घेतली. आपल्या सभेतून राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा सांगताना, महिला, शेतकरी, (Farmer) युवकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जातनिहाय जनगणना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोलही केला. त्यामुळे, राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारीही राहुल गांधींच्या सभेसाठी उपस्थित होते. दरम्यान, सभेनंतर राहुल गांधींना लातूरमध्ये (Latur) मुक्काम करावा लागणार आहे. हवाई उड्डाणाचे तांत्रिक कारण देत राहुल गांधींच्या दिल्ली दौऱ्याचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 


दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात आज राहुल गांधींना मुक्काम करावा लागणार आहे. कारण, सोलापूरमधील सभेनंतर ते लातूरमधून दिल्लीसाठी रवाना होणार होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे हवाई उड्डाण होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी सोलापूरवरुन लातूरला विमानतळावर दाखल झाले, आणि त्यानंतर ते दिल्लीकडे प्रयाण करणार होते. मात्,र संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्यामुळे त्यांना आज लातूरलाच मुक्काम करावा लागला. लातूर येथील ग्रँड हॉटेलमध्ये ते दाखल झाले आहेत. 


दरम्यान, राहुल गांधी लातूरमध्ये मुक्काम करणार असल्याचे कळल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली. तसेच सुरक्षा यंत्रणेलाही मोठा ताण पडलेला आहे. कारण, राहुल गांधीना भेटण्यासाठी आलेले लातूरमधील काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख हे हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधींच्या मुक्कामाची माहिती मिळताच जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते लातूरकडे धाव घेतानाचे चित्र दिसून येते. तर, लातूरच्या ग्रँड हॉटेलच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.


दरम्यान, राहुल गांधींनी अमरावती आणि सोलापूर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेतून अनेक आश्वासने दिली आहेत. त्यासोबतच, मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार असून 25 उद्योगपतींना अब्जाधीश करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आम्ही कोट्यवधी महिलांना, युवकांना लक्षाधीश करणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. 


हेही वाचा


दर महिन्याला टकाटक... टकाटक... टकाटक...; अमरावतीत राहुल गांधींची घोषणा, उपस्थितांचा जल्लोष


Rahul Gandhi: राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा, सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन