एक्स्प्लोर
Advertisement
मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, करा चौकशी, असं मोदी का म्हणत नाहीत? : राहुल गांधी
नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या अनिल अंबानींना कंत्राट मिळवून दिलं. अनिल अंबानींच्या फायद्यासाठी देशात राफेल विमानं यायला उशीर केला, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
नवी दिल्ली : शेतमालाचे भाव, रोजगार याप्रमाणेच राफेल विमान कराराच्या फाईल्सही गहाळ झाल्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी जर दोषी नाहीत, तर ते राफेल घोटाळ्याची चौकशी का करत नाहीत? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, करा चौकशी, असं पंतप्रधान का म्हणत नाहीत? मोदी जर दोषी नाहीत, तर ते राफेल घोटाळ्याची चौकशी का करत नाहीत? त्यांनी जेपीसीची मागणी का फेटाळली? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या अनिल अंबानींना कंत्राट मिळवून दिलं. अनिल अंबानींच्या फायद्यासाठी देशात राफेल विमानं यायला उशीर केला, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
राफेलच्या फाईल्स गहाळ होण्यामागे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र पीएमओची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
पीएमओचा हस्तक्षेप होता, असं राफेल कराराच्या फाईलमध्ये नमूद केलं होतं. जर कागदपत्रं गायब झाली, तर याचा अर्थ ते खरे आहेत, हे तुम्हीही कबूल करता, विमानांची किंमत वाढवल्याचं कागदपत्रात स्पष्ट नमूद केलं आहे. खऱ्या कागदपत्रांमुळेच राफेलच्या फाईल्स गहाळ झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी लावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
लातूर
Advertisement