एक्स्प्लोर

राहुल गांधींकडे पुन्हा अध्यक्षपद सोपवा, काँग्रेस कार्यकारिणीत मागणीला जोर

खासदार राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्याच्या मागणीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर देण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनीही याबाबत नकार दिलेला नाही. उलट सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याच्या मागणीला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर देण्यात आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या बैठकीत राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावतसह अनेक नेत्यांनी प्रस्तावाला समर्थन दिलं. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी नकारही दिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष होतील याबाबत अटकळ बांधली जात आहे.

दुसरीकडे काँग्रेसने सीडब्ल्यूसीच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल यांना अध्यक्ष बनवण्याच्या मागणीशी संबंधित प्रश्नावर काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी रणदीप सुरेजवाला म्हणाले की, "ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण बैठकीत यावर चर्चा झाली नाही. राहुल गांधी योग्य वेळी निर्णय घेतील."

राहुल आणि सोनिया गांधींकडून अद्याप प्रतिक्रिया नाही काँग्रेस कार्यकारिणीच्या व्हर्च्युअल बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीला बहुतांश नेत्यांनी समर्थन दिलं. परंतु सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जाणकारांच्या मते, या मागणीनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्याची शक्यता वाढली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा 2017 वर्षाच्या अखेरीस काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दो महिने त्यांची मनधरणी करण्यात आली. परंतु यात यश न आल्याने ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी यांची पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र तेव्हापासून अनेक वेळा पक्षातून राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवावं अशी मागणी होत आहे.

देशाची भावना लक्षात घेऊन राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष बनावं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रस्ताव ठेवताना राहुल गांधी यांनी देशाची भावना लक्षात घेऊन काँग्रेसची धुरा सांभाळायला हवी. या बैठकीत अशोक गहलोत यांच्याशिवाय राजस्थान सीडब्ल्यूसी सदस्य रघुवीर मीणाही उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

Embed widget