Rahul Gandhi on Karnataka Election Result: कर्नाटकातील काँग्रेसच्या (Congess) घवघवतीत यशानंतर देशभरातून प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद लावली होती. त्याचे सकारात्मक परिणाम देखील काँग्रेसला मिळाल्याचं चित्र कर्नाटकात (Kranataka Election) पाहायला मिळालं. निवडणुकांच्या निकालादरम्यान काँग्रसेचे नेते राहुल गांधी हे दिल्लीच्या काँग्रेस भवनात पोहचले. तिथे त्यांनी निवडणुकांच्या कलानंतर पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधला. कर्नाटकमधील द्वेषाचं दुकान बंद झालं असून प्रेमाचं दुकान सुरू झाल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. कर्नाटकात काम करणाऱ्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पक्षातील नेत्यांचे अभिनंदन राहुल गांधींनी केले. 


कर्नाटकात एकीकडे सरकारच्या भांडवदारांचे वर्चस्व होते, तर दुसरीकडे जनतेची ताकद होती,त्यामुळे या निवडणूकीत ताकदीने वर्चस्वाचा पराभव झाला आहे असं राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक राज्यात अशीच स्थिती निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखवला आहे. 'काँग्रेस कर्नाटकातील गरीब जनतेसोबत उभी राहिली आहे, आम्ही प्रेमाने ही लढाई जिंकलो आहोत, तसेच कर्नाटकाने दाखवून दिले की या देशाला प्रेम आवडते' असं देखील राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 


'कर्नाटकात द्वेषाचा बाजार संपवून प्रेमाचे दुकान उघडले'


कर्नाटकाच्या निवडणुकातील यशानंतर काँग्रेसच्या पदरी चांगलाच आनंद पडल्याचं चित्र सध्या आहे. यावेळी की, कर्नाटकात द्वेषाचा बाजार संपवून प्रेमाचे दुकान उघडले आहे असं म्हणत राहुल गांधींनी विरोधकांवर आपलं टिकास्त्र सोडलं. तसेच कर्नाटकातील जनतेला दिलेली पाच आश्वासनं पहिल्याच मंत्रिमंडळात पूर्ण करणार असल्याचं विधान देखील राहुल गांधींनी केलं आहे. 






ही होती पाच आश्वासनं


1. सर्व नागरिकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज.
2. घरातील प्रमुख स्त्रीला दरमाहा 2000 रुपये. 
3. पूर्ण कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस प्रवास. 
4. पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना दरमाहा तीन हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांना दरमाहा 1500 रुपये देणार. 
5. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमाहा प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ मिळणार.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Why Congress Won Karnataka: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय का? जाणून घ्या कारणे