नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकावरुन मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. या बिलाला शेतकऱ्यांच्या मृत्यूचे फर्मान असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात त्यांना मोदी सरकारच्या अहंकारामुळे दुःख भोगावं लागत आहे.


राहुल गांधी यांनी ट्वीट मध्ये म्हटलय की "जे शेतकरी जमीनीतून सोनं पिकवतात, मोदी सरकारच्या अहकारामुळे त्यांना दुःख भोगावं लागत आहे. राज्यसभेत आज ज्याप्रकारे कृषि विधेयकाच्या रुपात सरकारने शेतकऱ्यांच्या मृत्यूचं फर्मान काढलं, त्यामुळे लोकशाहीची मान खाली गेलीय"





शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर

लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली. या दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. सभागृहात मोठा गोंधळ उडाल्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली.


या विधेयकांना विरोध करत विरोधी खासदार उपसभापतींच्या आसनापर्यंत पोहोचले. या गोंधळात केंद्रीय कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं देत होते. या गोंधळामुळं राज्यसभेचं कामकाज काही काळ थांबलं देखील.


राज्यसभेत झाला जोरदार विरोध
कृषी क्षेत्रातील महत्वाच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या बिलांवरुन राज्यसभेत मात्र घमासान सुरु आहे. या बिलावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु असून विरोधकांकडून बिलावरुन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे बिल म्हणजे शेतकऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे तर ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?, त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.


महत्वाच्या बातम्या : 


शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर, अभूतपूर्व गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित


राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेवेळी शरद पवार अनुपस्थित, विधेयकावर शिवसेना-राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका


Agriculture Bill: कृषी बिलावरुन राज्यसभेत घमासान, काँग्रेस म्हणते हे शेतकऱ्यांचं डेथ वॉरंट, संजय राऊत म्हणाले...


Rajyasabha Chaos | राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ, कृषी विधेयकावरून विरोधकांकडून मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी