एक्स्प्लोर

गुजरात निवडणुकीआधीच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी 1998 पासून सोनिया गांधी आहेत. 47 वर्षीय राहुल गांधी 2004 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर 2004 पासून आजतागायत ते अमेठीचं नेतृत्व करत आहेत.

नवी दिल्ली : तब्बल 19 वर्षांनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं असून, या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी तारीख ठरवण्यासाठी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची आज सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात निवडणुकीच्या आधीच राहुल गांधी यांच्या खांद्यावर पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल. काँग्रेसच्या आजच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या तारखेसह, निवडणूक अधिसूचना, उमेदवारांचे अर्ज, अर्ज परत घेण्याची तारीख, मतदान या गोष्टींची घोषणा केली जाईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पक्षाध्यक्षपदासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मतदान करतात. मात्र सध्याची स्थिती पाहता, राहुल गांधी यांच्यासमोर कुणीच उमेदवार आव्हान उभे करणार नसल्याने, ही निवडणूक एकतर्फी आणि बिनविरोध होण्याचीच अधिक शक्यता आहे. गेल्या काही दिवसात देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेसने ठराव संमत करुन, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवण्याबाबत मागणी केली आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड झाल्यानंतर, खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यांच्या नेतृत्त्वात नवी कार्यकारिणी निवडली जाईल. काँग्रेस कार्यकारिणी ही पक्षांतर्गत निर्णय घेणारी महत्त्वाची समिती आहे. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी 1998 पासून सोनिया गांधी आहेत. 47 वर्षीय राहुल गांधी 2004 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर 2004 पासून आजतागायत ते अमेठीचं नेतृत्व करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी गुजरात निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. मोदींचं होमग्राऊंड असूनही, राहुल गांधींनी भाजपला नाकीनऊ आणले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित, कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित, कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO

Embed widget