एक्स्प्लोर

शेजारी न बसायला राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का? गडकरींचा उद्विग्न सवाल

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राजपथावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसले होते. कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि राहुल यांच्यामध्ये काहीतरी बोलणे सुरु होते. त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राजपथावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसले होते. कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि राहुल यांच्यामध्ये काहीतरी बोलणे सुरु होते. त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघांमध्ये कोणती राजकीय चर्चा झाली असेल, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. यावर गडकरी यांनी आज स्पष्टीकरण दिले. नितीन गडकरी आज एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी केल्या जाणाऱ्या आसनव्यवस्थेत माझ्या शेजारची खुर्ची काँग्रेस अध्यक्षांची असते. त्यामुळे पूर्वी त्या खुर्चीवर (माझ्या शेजारी) सोनिया गांधी बसत होत्या. यावेळी राहुल गांधी बसले होते. समोरून अनेक चित्ररथ जात होते. आम्ही दोघे अधून-मधून एकमेकांशी या चित्रपरथांबद्दल बोलत होतो. जे लोक आमच्या एकत्र बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्यांनी मला सांगावं शेजारी न बसायला राहुल गांधी काय पाकिस्तानचे आहेत का? आणि आपण तर पाकिस्तानशीही चर्चा करतोच की', मग आम्ही शेजारी बसलो म्हणून काय फरक पडला. माध्यमांमध्ये नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींनी केलेली काही विधाने ही सरकारविरोधी असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी पसरवल्या होत्या. तसेच गडकरींनी एक-दोन ठिकाणी माजी पंतप्रधान पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांचे जाहीर कौतुक केले होते. त्यावरुन गडकरी हे मोदी-शाह जोडीवर नाराज असून काँग्रेस नेत्यांचे कौतुक करत आहेत, अशा बातम्याही काही माध्यमांनी पसरवल्या. या सर्व गोष्टींवर नितीन गडकरी यांनी आज शिखर परिषदेत स्पष्टीकरण दिले. माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्प्ष्टीकरण देताना गडकरी म्हणाले की, 'मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे मला पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही.' माध्यमं माझ्या बोलण्याचा अनेकदा चुकीचा अर्थ काढतात. मी जे काही बोलतो, माधमं त्यापैकी थोडाफार भाग कापून प्रसिद्ध करतात. त्यातून गैरअर्थ काढले जातात. त्यामुळे मी माध्यमांवर आणि माध्यमांच्या प्रतिनिंधींवर नाराज आहे. अनेकदा मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात येते. संबधित बातमी : मला पंतप्रधानपदाचा लोभ नाही, गडकरींचं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Allahabad HC Decision : मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget