एक्स्प्लोर

मोदी मुख्यमंत्री असताना सहाराने 40 कोटी दिले, राहुल गांधींचा आरोप

मेहसाणा : गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहारा समुहाने 40 कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमधील मेहसाणामध्ये राहुल गांधींची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी मोदींवर आरोपांचा भडीमार केला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाराने त्यांना 6 महिन्याच्या कालावधीत 9 वेळा पैसे दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 22 नोव्हेंबर 2014 रोजी आयकर विभागाने सहारावर टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्र हाती लागली आहेत. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. इतकेच नव्हे तर बिर्ला समुहावरील छाप्यात आयकर विभागाला एक डायरी आढळली होती. यात 'गुजरात सीएम 25 कोटी' असा उल्लेख आढळल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आता या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. भाजपचं प्रत्युत्तर राहुल गांधींना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांना पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची सवय झाली असून खोट्या आरोपांच्या आधारावर काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे, असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टातही दरम्यान राहुल गांधींनी मोदींवर जे आरोप लावले आहेत, ते प्रकरण अगोदरच सुप्रीम कोर्टातही गेलं आहे. मात्र राहुल गांधींनी आज सादर केलेल्या पुराव्यांना कोर्टाने अवैध होतं. एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मात्र हे प्रकरण पुढे चालवण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. प्रशांत भूषण यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. काँग्रेसचा होमग्राऊंडवरच मोदींना घेरण्याचा डाव दरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याचसमोर आव्हान उभं करण्याची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी मेहसाणामधील दिसामध्ये शेतकऱ्यांना संबोधित केलं होतं. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत राहुल गांधींकडून आपला संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे पाटीदार समाजामध्येही आपलं स्थान निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Embed widget