एक्स्प्लोर

सत्तेत आल्यावर संघाला तिरंग्याची आठवण : राहुल गांधी

राजधानी दिल्लीत विरासत बचाओ संमेलनात संबोधित करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. संघाला संविधान बदलायचं आहे, त्यामुळे या शक्तींविरोधात एकत्र मिळून लढण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमध्ये ध्वजारोहण केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयसेवक संघाला तिरंग्याला आठवण आली, अशा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल चढवला. राजधानी दिल्लीत विरासत बचाओ संमेलनात संबोधित करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. संघाला संविधान बदलायचं आहे, त्यामुळे या शक्तींविरोधात एकत्र मिळून लढण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले. संघाला संविधान बदलायचं आहे आरएसएसच्या देशभक्तीवर निशाणा साधताना, राहुल गांधी म्हणाले की, "सत्ता मिळण्याआधी या संघटनेने कधीही तिरंग्याला सलाम केला नाही. प्रत्येक संस्थेत आरएसएसने आपल्या लोकांची नियुक्ती केली आहे. आरएसएसला संविधान बदलायचं आहे. एक व्यक्ती एक मत असं संविधानात लिहिलं आहे. पण संविधानाने दिलेले अधिकार आरएसएसला नष्ट करायचे आहेत. त्यांना संविधान बदलायचं आहे." रवीशंकर प्रसाद यांचा पलटवार राहुल गांधी यांच्या टीकेनंतर सत्ताधारी भाजपने पलटवार केला आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. एकेकाळी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणीबाणीच्या काळात 'कमिटेड ज्युडिशरी'बाबत बोलल्या होत्या. त्यामुळे अशी विधानं करणं राहुल गांधींनी शोभत नाही. ज्युडिशरी आणि मीडिया या संस्थांबाबत राहुल गांधींच्या विधानाचा भाजप तीव्र शब्दात विरोध करत आहे. देशातील लोक संघाचा आदर करतात. आज भाजप 70 टक्के देशावर राज्य करते. आता राहुल गांधींनी ही गोष्ट समजत नाही म्हणून त्यांच्या दया येते. काँग्रेसच्या लोकांनी राहुल गांधींना देशाच्या राजकीय समज काय असते याचं शिकवण द्यावी, असंही रवीशंकर प्रसाद म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget