एक्स्प्लोर

राफेल ‘चोरी’ मुळे फ्रान्स सरकार अडचणीत, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

एका एनजीओने राफेल मुद्द्यावरून तिथल्या लोक अभियोजक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या एनजीओने या प्रकरणातील तथ्याची गंभीरपणे चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांचा सौदा होता? याची माहिती देखील एनजीओने मागविली आहे.

नवी दिल्ली:  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. राफेल विमानाच्या या ‘चोरी’ मुळे फ्रांसचे सरकार देखील अडचणीत आले असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींवर हल्ला चढवला आहे.  'आपल्या चौकीदाराच्या चोरीने फ्रांस सरकार अडचणीत आले आहे. राफेल विमानाच्या सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्सची जनता करू लागली आहे, असे सांगत आता केवळ गल्लीतच नव्हे तर जगभरात देखील हिंदुस्थानचा चौकीदारच चोर आहे हे कळू लागलेय असे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी एका वृत्ताचा आधार घेत ही टीका केली आहे. या वृत्तामध्ये फ्रांसच्या एका एनजीओने राफेल मुद्द्यावरून तिथल्या लोक अभियोजक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या एनजीओने या प्रकरणातील तथ्याची गंभीरपणे चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांचा सौदा होता? याची माहिती देखील एनजीओने मागविली आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका करत मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावर राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे, असे थेट आव्हान मोदींना दिले होते. "मी नरेंद्र मोदी यांना आव्हान देतो, मोदींनी केवळ 15 मिनिटे राफेल विषयावर माझ्याशी चर्चा करावी. मी अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या विधानांवर आणि राफेल विमानांवर बोलणार आहे. मोदींनी राफेल विमानांमध्ये घोटाळा केल्याचे सुरक्षा मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले होते. तसेच पंतप्रधानांनी कुठल्याही कायद्याचे पालन केलेले नाही. पंतप्रधान माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत." असे राहुल म्हणाले होते. राफेल विमान खरेदी करार भारताकडून 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षीच्या फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली. ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय? यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमानं भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खेरदीचा निर्णय घेतला. मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात त्यांना यशही मिळालं. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला. संबंधित बातम्या  काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?   राफेल डीलबाबत सरकारला हवाई दलाची साथ  मोदी 'चोरांचे सरदार', राहुल गांधींचा पुन्हा हल्ला   फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप   काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?    राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद    गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है : राहुल गांधी    ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय?

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget