नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या कालच्या एका ट्विटमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.सोशल मीडिया सोडणार असल्याचा विचार करतोय अशा ट्विटमुळे त्यामागच्या कारणांचा आढावा तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. शिवाय, सिंगापूरच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडला आहे.






पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच आता मोदींनी एक ट्वीट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. जागतिक महिला दिनी आपण अशा एका कर्तबगार महिलेला आपले सोशल मीडिया अकाऊंट चालवायला देणार आहोत. जी करोडो लोकांना प्रेरणादायी आहे, असं ट्वीट मोदींनी करत सोशल मीडिया सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.


दरम्यान, नरेंद्र मोदींनी काल केलेल्या ट्वीटनंतर विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.



PM Modi Twitter | महिला दिनी पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट महिला चालवणार, मोदी ट्विटर सोडणार नाहीत




संबंधित बातम्या :


मोदी सोशल मीडिया अकाउंट बंद करणार नाहीत तर, महिलांकडे सोपवणार


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्वीटवर विरोधकांची खोचक टीका


सोशल मीडियावर मोदींचे फॉलोअर्स कोटींच्या घरात; 2019मधील 'ते' ट्वीट 'गोल्डन ट्वीट'