एक्स्प्लोर

राफेल प्रकरण : भाजप देशभरात 70 पत्रकार परिषदा घेणार

राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने कोंडी केलेल्या भाजपला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात भाजपनेही काँग्रेसविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसने भाजपला घेरलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर भाजपला बळ मिळाले आहे. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि राफेल प्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी भाजप देशभरात 70 पत्रकार परिषदा घेणार आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने कोंडी केलेल्या भाजपला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात भाजपनेही काँग्रेसविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे संसदेच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच सरकार सुधारित तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडणार असण्याची शक्यता आहे. देशभर गाजत असलेल्या राफेल विमानांच्या करारावर मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान मोदींनीही मौन सोडलं आहे. रायबरेलीत बोलताना मोदींनी राफेल करारावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. खोटेपणा हाच काँग्रेसच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसचा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही, असं मोदी म्हणाले. फ्रान्ससोबतच्या राफेल विमानांच्या करारात मोदी सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं मात्र या प्रकरणात हस्तक्षेपास नकार देत करारावर शंका उपस्थित करणं अयोग्य असल्याची टिप्पणी दिलीय. काँग्रेस मात्र या कराराची जेपीसी अर्थात संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी अडून बसली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

Embed widget