एक्स्प्लोर
Advertisement
राधामोहन सिंह आणि जे पी नड्डांवर मेहरबानी का?
कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे.
नवी दिल्ली: खराब कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला असला, तरीही दोन अकार्यक्षम मंत्र्यांना मात्र अभय दिलं आहे. कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे.
खरं तर महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही राधामोहन सिंहांना कृषीमंत्रीपदावर कायम ठेवण्यात आलं आहे.
तर उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये 60 हून अधिक चिमुकल्यांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. याशिवाय देशातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे. तरीही या दोन मंत्र्यांना अभय का दिलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह खुल्या भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद
एकीकडे वाढत्या रेल्वे अपघातामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन, सुरेश प्रभू यांनी स्वत:हून राजीनामा सादर केला. प्रभूंच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत होते. असं असताना, सुमार कामगिरीमुळे टीकेचे धनी बनलेले कृषमीमंत्री राधामोहन सिंह आणि आरोग्यमंत्री जे पी नड्डा पदावर कायम असल्याने, प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी मंत्रिमंडळात सर्वात मोठा फेरबदल केला आहे. मंत्रिमंडळातील 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली, तर 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे.
कुणाला कोणतं मंत्रालय?
कॅबिनेट मंत्री
सुरेश प्रभू – वाणिज्य
पियुष गोयल – रेल्वे
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि कौशल्यविकास
नितीन गडकरी – रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
स्मृती इराणी – माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग
राज्यवर्धन राठोड – क्रीडामंत्री
राज्यमंत्री
सत्यपाल सिंग – शिक्षण राज्यमंत्री
गजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री
हरदीपसिंग पुरी – नगरविकास राज्यमंत्री
नरेंद्र तोमर – ग्रामविकास राज्यमंत्री
अल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन राज्यमंत्री
महेश शर्मा – संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री
शिवप्रताप शुक्ल – अर्थ राज्यमंत्री
आर. के. सिंग – ऊर्जा (स्वतंत्र कारभार)
संबंधित बातम्या
केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली!
2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
देशाच्या नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची ओळख
1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात!
भारतासह या 15 देशात संरक्षणमंत्रीपदी महिला!
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह खुल्या भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement