कोलकाता : भारताचे प्रसिद्ध कवी, साहित्यकार, तत्वज्ञानी, संगीतकार आणि नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी, 7 ऑगस्ट 1941 रोजी कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. भारताच्या इतिहासात रविंद्रनाथ टागोरांचे योगदान महत्वपूर्ण आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या 10 गोष्टी.
1. रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी बंगालमधील जोजासांको या ठिकाणी झाला. रविंद्रनाथ टागोरांनी भारताच्या आणि बांग्लादेशच्या राष्ट्रगीताची निर्मिती केली. त्यांनी कला, साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं.
2. भारत आणि बांग्लादेश या दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव कवी आहेत.
3. रविंद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी आपले पहिले काव्य लिहिलं होतं तर 16 व्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली होती.
4. रविंद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपलं योगदान दिलं.
5. 'गीतांजली' या काव्यरचनेसाठी 1913 साली त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. साहित्याचा नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती होते.
6. विद्यार्थ्यांनी शाळेच्या चार भिंतींच्या बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेतलं पाहिजे या विचारातून त्यांनी शांतिनिकेतनची सुरुवात केली.
7. रविंद्रनाथ टागोर हे नावाजलेले चित्रकारही होते. त्यांनी या क्षेत्रात अनेक प्रसिद्ध कलाकृतींची निर्मिती केली आहे.
8. रविंद्रनाथ टागोर यांचे विचार राष्ट्रवादी आणि मानवतावादी होते. त्यांनी त्यासाठी शेवटपर्यंत काम केलं.
9. रविंद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने 'सर' ही पदवी दिली होती. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्त त्यांनी ती परत केली.
10. महात्मा गांधी यांना रविंद्रनाथ टागोरांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना गुरूदेव अशी उपाधी दिली. रविंद्रनाथ टागोर यांनी 7 ऑगस्ट 1947 साली कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला.
रविंद्रनाथ टागोर यांनी आपल्या कार्यकालात अनेक देशांचा दौरा केला. त्यांनी आयुष्यभर पूर्व आणि पश्चिम जगतामधील दुवा म्हणून काम केलं. भारताच्या . अशा या महान सुपुत्राला पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन.
महत्वाच्या बातम्या :