पंजाब : मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. याचेच उदाहरण पंजाबमध्ये पाहायला मिळाले आहे.आई अंगणवाडी सेविका आणि वडिल शेतकरी आहेत. सामान्य परिस्थिती असूनही पंजाबच्या कुलबीत कौर  हिने गगन भरारी घेऊन बिहाला गावच्या लौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे काही दिवसाताच कुलबीर कमर्शिअल पायलटचे लायसन्स मिळणार आहे.  


बरनाला जिल्ह्यातील बिहाला गावातील कुलबीत कौरने गगन भरारी घेऊन  कुटुंबियांच्या मान उंचावली आहे. कुलबीत कौरचे वडिल शेतकरी आणि आई अंगणवाडी सेविका आहे. आतापर्यंत कुलबीरने 150 तासाचे खडतर प्रशिक्षण  पूर्ण झाले असून 50 तासाचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. त्यानंतर कुलबीर कमर्शिअल फ्लाईटचे लायसन्स मिळणार आहे.  लहानपणीच विमान चालविण्याचे स्वप्न बाळगले होते.  स्वप्न साकारण्यासाठी आई-वडिलांसह कुटुंबीयांनी तिला सुरूवातीपासून प्रोत्साहन दिले. 




आकाशातून जाणारी विमाने तिला कायम आकर्षित करत होती. कुलबीरने आपल्या करिअरची सुरूवात पटियाला फ्लाईंग क्लब येथून सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर 150 तासाचे प्रशिक्षण तिने अन्य संस्थेतून केले. आता फक्त 50 तासाचे प्रशिक्षण बाकी आहे. हे 200 तासाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला कमर्शिअल फ्लाईटचे लायसन्स मिळणार आहे. वैमानिक होण्यासाठी जवळपास 70 ते 80 लाखांचा खर्च येतो. हा खर्च आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्य विक्रमजीत साहनी यांनी कुलबीरला शिष्यवृत्ती मिळवून देण्यास मदत केली आहे. कुलबीर पुढील प्रशिक्षणासाठी विदेशात जाणार आहे. 




 कुलबीरचे कौरची आई सरबजीत कौर म्हणाल्या की, लहानपणापासून वैमानिक बनण्याचे स्वप्न होते. यासाठी मी कायमच प्रोत्साहन दिले आहे.  इथेपर्यंत पोहोचण्यासाठी कुलबीरने खूप कष्ट घेतले. अखेर तिच्या जिद्दीला यश आले. आता तिचे विमान उडविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात यावे हीच इच्छा आहे. कुलबीरचे सध्या तिच्या गावात देखील कौतुक होत आहे. एका छोट्या गावातील सामान्य कुटुंबात राहणाऱ्या कुलबीरचे सध्या कौतुक होत आहे.