मुंबई : अमेरिकेन सरकारकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणारा नोकऱ्यांसंबंधीचा अहवाल (Jobs Data) येत्या दोन दिवसात प्रकाशित केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारातील (Share Market) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी अस्थिरता दिसून आली. अमेरिकेतल्या फेडने या महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले असले तरी ही अस्थिरता दिसून आली. 


अमेरिकेत (US) वाढती महागाई (Inflation) आणि मंदीसदृश्य परिस्थिती असतानाही अमेरिकेतील जॉब डेटामुळे (Jobs Data) फेडला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेडला कोणतीही चिंता न करता व्याजदरात वाढ करता येऊ शकेल. अमेरिकेतील जॉब डेटा म्हणजे नोकऱ्या संबंधित अहवाल हा अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 


 शेअर बाजारात (Stock Market Updates) आज मोठी अस्थिरता दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 36 अंकांची वाढ झाली तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 3.30 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.02 टक्क्यांची घट होऊन तो 17,539 अंकांवर स्थिरावला. 


आज कॅपिटल गुड्सच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली तर ऑईल  अॅन्ड गॅसच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची घट झाली. आयटी, मेटल, ऑईल ऑईल अॅन्ड गॅस, फार्मा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी घट झाली. 


आज आयटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.75 टक्क्यांची वाढ झाली. तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 1.69 टक्क्यांची वाढ झाली. तर बीपीसीएल आणि श्री केमिकल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 2.84 आणि 2.31 टक्क्यांची घसरण झाली.


आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर आज 95 डॉलर प्रति बॅरेल इतके झाले आहेत. तर डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 25 पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत 79.55 इतकी झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :