Punjab Elections : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Elections) 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. चंदीगडच्या पोलिस उपअधीक्षकांनी (डीएसपीं) यांनी सिद्धूंविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडचे डीएसपी दिलशेर सिंह चंदेल (DSP Dilsher Chander) यांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या कोर्टात सिद्धूविरोधात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली आहे.


काय म्हणाले डीएसपी?


"2021 मध्ये एका रॅलीत पोलिसांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल सिद्धू माफी मागण्यास अयशस्वी ठरले, म्हणून मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या कोर्टात सिद्धूविरोधात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली आहे."


 






सिद्धू यांनी पोलिसांवर काय केली होती टिप्पणी? 


डिसेंबर 2021 मध्ये पंजाबच्या माजी मंत्री अश्विनी सेखड़ी यांच्या रॅलीत पोहोचलेल्या सिद्धूंनी पंजाब पोलिसांची खिल्ली उडवली होती. अश्विनी सेखड़ी यांनी एक धक्का मारला तर पोलिसांची पॅंट ओली होते, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी त्यांना या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी हे केवळ गंमतीनेच बोललो असल्याचे सांगितले. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, असेही सिद्धू म्हणाले. यानंतर चंदीगड पोलिसांच्या डीएसपींनी नवज्योत सिंग सिद्धू यांना नोटीस पाठवून मानहानीचा खटला दाखल केला.


117 जागांसाठी उद्या मतदान


पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. खरं तर, चंदीगडच्या डीएसपींनी सिद्धूविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.


 


संबंधित बातम्या


Pulwama terror attack : दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू


Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्..