Punjab Election 2022 : पंजाबमध्ये भाजप (BJP) कॅप्टन अमरिंदर आणि ढींढसा यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा पंजाबमध्ये 65, कॅप्टन अमरिंदर सिंह  (Amarinder Singh)  यांची  पंजाब लोक काँग्रेस 37 आणि सुखदेव ढिंडसा यांची पार्टी 15 जागांवर निवडणुका लढवणार आहे. 





सोमवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda)  यांनी जागा वाटपाची घोषणा केली. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव ढिंडसाही उपस्थित होते. या तीन पक्षांच्या आघाडीने 117 पैकी 71 जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पंजाबमध्ये उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पंजाब सीमेवरील राज्य असल्याने देशाच्या सुरक्षेशी जोडला गेलेला प्रदेश आहे. पाकिस्तानातून ड्रग्स, शस्त्रांचं स्मगलिंग केलं जातंय. आम्ही पंजाबमधून ड्रग्स, रेती आणि लँड माफियांचा खात्मा करू असं यावेळी जे. पी. नड्डा म्हणालेत.


 







नड्डा पुढे म्हणाले, पंजाबवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जो पंजाब एकेकाळी विकासात अग्रेसर होता तो आता माग पडत आहे. पंजाबला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची जबाबदारी आमची आहे. केंद्र आणि राज्यातील संबंध तसेच सुरक्षा यासाठी हे आवश्यक आहे. 


भाजपने पंजाब विधानसभा निवडणुकांसाछी 34 उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली होती. या यादीमध्ये 12 शेतकरी कुटुंबातील, 13 शिख आणि आठ तिकिटे अनुसुचीत जमातीतील उमेदवारांना दिली आहेत. अमरिंदर सिंह यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंह यांना नकोदरा येथून उमेदवारी दिली आहे. अमरिंदस सिंह पटियाला येथून निवडणूक लढवणार आहे. पंजामध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 10 मार्चला मतमोजणी आहे. 


महत्वाच्या बातम्या वाचा -
UP Election : प्रियांका गांधी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जाणून घ्या काय म्हणाल्या प्रियांका गांधी
UP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपकडून आतापर्यंत 194 उमेदवारांची यादी जाहीर; कोणाकोणाला उमेदवारी?
Covid19 : तिसर्‍या लाटेचा धोका! पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची स्थिती...


देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live