एक्स्प्लोर

Punjab Congress : नवज्योत सिंह सिद्धूच पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल गांधींच्या भेटीनंतर राजीनामा मागे 

Congress Crisis: काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धूंनी  (Navjot Singh Sidhu) पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे.

Congress Crisis: पंजाबमधील काँग्रेसचा (Punjab Congress) अंतर्गत कलह आता शांत होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धूंनी  (Navjot Singh Sidhu) पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सिद्धूंची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यामुळे आता सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. दरम्यान, 10 महिन्यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पक्षांतर्गत वादाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. 

नवज्योत सिंह सिद्धूंनी बैठकीनंतर म्हटलं की, आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे. मी हायकमांडला माझ्या मनातील काळजी सांगितली. राहुल गांधी, प्रियांका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी चांगला असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे, असं सिद्धू यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते हरिष रावत यांनी सांगितलं की,  सिद्धू यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिलं, असं हरीश रावत यांनी सांगितलं.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नाराजीला न जुमानता काँग्रेस हायकमांडने 18 जुलै रोजी सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. वाद थांबत नसल्याचे पाहून 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर, चरणजीत सिंह चन्नी यांनी 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी सिद्धूचे जवळचे मानले जातात. मात्र, 28 सप्टेंबर रोजी सिद्धू यांनी चन्नी सरकारच्या निर्णयांवर नाराज झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget