News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

पंजाबमध्ये अकाली दलाला झटका, काँग्रेसला बहुमत

FOLLOW US: 
Share:
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे. काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.  तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस : 78 आम आदमी पक्ष : 20 अकाली दल 14 + भाजप 3 : 17 लोक इन्साफ पार्टी : 02 कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाला आणि लम्बी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांचा पटियाला मतदारसंघातून विजय झाला. तर लम्बीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी विजय मिळवला. Captain_Singh कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला. त्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन अमरिंदर सिंह यांचं अभिनंतर केलं. तर निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांचाही अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले. जनतेने दुष्टांच्या अहंकाराला नामोहरम केलं. पंजाबमध्ये काँग्रेसचा पुनर्जन्म झाला, बदल्याची भावना मागे सोडून विकास करायचा आहे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिली.
Published at : 11 Mar 2017 05:01 PM (IST) Tags: Captain Amrinder Singh कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेस Congress

आणखी महत्वाच्या बातम्या

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन IMPS व्यवहारांवर आकारणार शुल्क, काय सांगतो नवीन नियम? 

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या खिशावर परिणाम होणार, SBI नियमांमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती 

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी पोलिसांनी रोखली; साधूला पोलिस स्टेशनला नेत मारहाण

टॉप न्यूज़

Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?

Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी

Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule

Tanaji Sawant: शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...