एक्स्प्लोर

Pulwama terror attack : एक डझनहून अधिक संशयित ताब्यात, जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांचा शोध सुरू

स्फोटकांना भरलेल्या एका वाहनाने सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडक दिली आणि त्यानंतर स्फोट झाला. दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला याआधी केला नव्हता. पाकिस्तानातील एक नागरिक कामरानने या हल्ल्याची योजना आखल्याचं बोललं जात आहे. हा कामरान जैश-ए-मोहम्मदचा सदस्य असल्याचं बोललं जात आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या योजनेशी संबध असल्याच्या संशयातून काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा आणि अवंतीपुरा येथून या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

स्फोटकांना भरलेल्या एका वाहनाने सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडक दिली आणि त्यानंतर स्फोट झाला. दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला याआधी केला नव्हता. पाकिस्तानातील एक नागरिक कामरानने या हल्ल्याची योजना आखल्याचं बोललं जात आहे. हा कामरान जैश-ए-मोहम्मदचा सदस्य असल्याचं बोललं जात आहे. कामरान दक्षिण काश्मीरच्या पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल परिसरात सक्रिय आहे.

दहशतवादी आदिल अहमदने हा आत्मघाती केल्याचं समोर येत आहे. 2018 मध्ये आदिल जैश ए मोहम्मदमध्ये सहभागी झाला होता. आदिल दक्षिण काश्मीरच्या गुंडीबाग काकपोरा पुलवामा परिसरातील रहिवाशी आहे. हल्ला झालेल्या ठिकाणाहून हा परिसर 10 किमी अंतरावर आहे. आदिलचा सुरक्षा यंत्रणांच्या दहशतवाद्यांच्या यादीतही समावेश होता. त्याच्यावर तीन लाखांचं बक्षिसही होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.

पाकिस्तानात सहा महिन्यांपूर्वी जैश ए मोहम्मदच्या कार्यालयात पुलवामा हल्ल्याची योजना आखल्याचं समोर येत आहे. या योजनेत मसूद अजहर, राशिद गाजी आणि आदिल यांचा समावेश होता. हल्ल्याबाबत काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनाही या हल्ल्याबाबत माहिती नव्हती.

14 फेब्रुवारी (गुरुवारी) हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

व्हिडीओ

संबधित बातम्या Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget