एक्स्प्लोर

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 40 भारतीय जवान शहीद झाले.

जम्मू : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात  39 भारतीय जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदच्या आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आज पुलवामाच्या अवंतीपुरा भागात लष्करी जवानांवर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. बुरहान वानी या दहशतवाद्याला तीन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी ठार केले. त्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर जम्मू आणि श्रीनगरमधील मोठ्या प्रमाणात तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले. आदिल दार हा गेल्या वर्षी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. या गाडीत 200 किलो स्फोटके होती. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात 40 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केलाय. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केलंय. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. VIDEO | पुलवामात दहशतवादी हल्ला, स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या बसवर धडकली संबधित बातम्या Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget