नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवल्याची कबुली पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांची दिली आहे.


भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख बाजवा यांना घाम फुटला होता आणि त्यांचे पाय थरथरत होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अयाझ सादिक यांनी केला. त्यांना उत्तर देताना फवाद चौधरींनी पुलवामा हल्ला हे इमरान खान सरकारचं यश असल्याचं म्हंटल आहे.


विशेष म्हणजे सादिक यांनी ही माहिती पाकिस्तानच्या असेंब्लीमध्येच दिली आहे. भारताकडून हल्ला होईल या भीतीनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं, असंही सादिक यांनी सांगितलं. अभिनंदन यांना सोडण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी हजर राहणं टाळलं. पण या बैठकीत उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री आणि लष्करप्रमुख या दोघांचाही कसा थरकाप उडाला होता, याचं वर्णन सादिक यांनी नॅशनल असेंब्लीतील भाषणात केलं.


विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. या मुद्द्यावरुन पाकीस्तानात अजूनही राजकारण सुरु आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी एफ-16 फायटर जेटला नेस्तनाबूत केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होतं. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेतलं होतं. तिथं विमान कोसळल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानात असल्याचा भास झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील काही महत्वाची कागदपत्रं तलावात फेकली तर काही कागद चावून खाऊन टाकले होते.


संबंधित बातम्या :



अभिनंदनसाठी भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी मंत्र्याला फुटला होता घाम!