एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार हा मुलगा लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यांपासून घरीच होता. या काळात त्याला या गेमचे व्यसन लागले. तो पब्जी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही. अशाने या मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत कमी होत गेल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
याआधी पुण्यात देखील अशी घटना घडली होती. हर्शल मेमाने नावाच्या युवकाचा गेम खेळताना ब्रेन स्ट्रोक आला होता. भिवंडीत पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. तर भिवंडीतील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचीही घटना घडली होती.
संबंधित बातम्या