भिवंडी शहरातील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मयुर राजेंद्र गुळुंजकरला मोबाईल वर पबजी गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. रात्ररात्र भर तो गेम खेळात असल्याने बऱ्याच वेळा त्याची आई त्याच्यावर रागावत असे. असाच नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर पबजी गेम खेळत बसला असता आईने रागावून तुझी तक्रार मामासा करते असे धमकावले. नंतर त्याला आईने बहिणीला आणायला भिवंडी रेल्वेस्टेशनला पाठवीले. घरातून दुचाकी घेऊन गेलेल्या मयुरने रेल्वे स्टेशन परिसरात येताच दुचाकीची चावी आणि मोबाईल दुचाकीच्या हॅण्डल समोरील जागेत ठेवून निघून गेला.
VIDEO | 'पबजी' जीवावर बेततोय! | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
नेहमीप्रमाणे भिवंडी रेल्वेस्टेशन परिसरात नेहमीच्या ठिकाणी त्याची बहीण आली असता आपला भाऊ न दिसल्याने तिने मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल दुचाकीवरच वाजत राहिल्यामुळे तिने घरी कुटुंबियांशी संपर्क करत या घटनेची माहिती दिली.
घरातून रागावून गेलेल्या मयूरचे वय हे सज्ञान नसल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणी नारपोली पोलीस अधिक तपास करत असून पोलीस व कुटुंबीय ठिकठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. मयूरच्या निघून जाण्याने त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत असून मयुरची आई मेघा गुळुंजकर आणि मामा नितीन खोपडे यांनी मयुरला घरी परत येण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या
PUBG खेळण्यासाठी महागडा मोबाईल न मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या
PUBG खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू