एक्स्प्लोर

प्रियांका गांधी यांचा बंगला भाजप खासदार अनिल बलुनी यांना मिळाला!

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना दिल्लीत बंगला रिकामा करण्यास सांगितलं आहे. या बंगल्यात आता भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी राहणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये असलेला बंगला भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख आणि राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांना दिला आहे. या बंगल्यात सध्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं वास्तव्य आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या एक अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'अनिल बलुनी यांच्या विनंतीनंतर त्यांना प्रियांका गांधी यांचा बंगला देण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी हा बंगला रिकाम्या केल्यानंतर अनिल बलुनी यांना बंगल्याचा ताबा मिळेल.

01 ऑगस्टपर्यंत प्रियांका गांधींना बंगला रिकामा करावा लागणार मंत्रालयाने 1 जुलै रोजी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या बंगल्याचं आवंटन रद्द केलं होतं. एसपीजी सुरक्षा काढल्याने त्यांना या निवासस्थानाची सुविधा मिळू शकणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मोदी सरकारने प्रियांका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत सध्याचं '35 लोधी इस्टेट' हे निवासस्थान रिकामं करण्यास सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अनिल बलुनी यांनी प्रकृतीच्या आधारावर बंगला बदलण्याची विनंती केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार झाले होते. "आता माझी प्रकृती ठीक आहे. परंतु मला काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याचं निवासस्थान माझ्यासाठी पूर्णत: योग्य नाही," असं अनिल बलुनी यांनी सांगितलं.

दरम्यान केंद्र सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा कमी करुन त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवली होती.

1997 मध्ये प्रियांका गांधींना बंगला मिळाला होता हा बंगला प्रियांका गांधी यांना 21 फेब्रुवारी, 1997 रोजी मिळाला होता, कारण त्यांना त्यावेळी एसपीजी सुरक्षा मिळाली होती, अशी माहिती मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. झेड-प्लस श्रेणीच्या सुरक्षेत अशाप्रकारच्या सुविधेची तरतूद नसते, त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागणार आहे, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget