एक्स्प्लोर
Advertisement
2019 ला रायबरेलीतून सोनियांऐवजी प्रियांका गांधी?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या हवाल्याने सूत्रांच्या मते, रायबरेलीतून 2019 ला कोण लढणार याबाबत सोनिया गांधींसोबत बातचीत होणं बाकी आहे आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आठ महिन्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अशातच काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आहे, ती म्हणजे प्रियांका गांधी रायबरेलीतून 2019 ची लोकसभा निवडणूक लढू शकतात.
काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांच्या मते, प्रियांका गांधींची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या हवाल्याने सूत्रांच्या मते, रायबरेलीतून 2019 ला कोण लढणार याबाबत सोनिया गांधींसोबत बातचीत होणं बाकी आहे आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे, जिथे आतापर्यंत गांधी घराण्यातूनच निवडणूक लढली गेली आहे. सध्या सोनिया गांधी या मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या सध्या या जागेसाठी योग्य पर्यायाच्या शोधात असून प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढू शकतात. यापूर्वीही प्रियांका गांधींनी आपल्या आईसाठी रायबरेली आणि भावासाठी अमेठीत प्रचार केला असल्याने त्यांची लोकप्रियता जास्त आहे.
यूपीत काँग्रेस आणि सपा-बसपा युती?
उत्तर प्रदेशात सपा-बसपा आणि काँग्रेस यांच्यात एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. जागा वाटपावर अजून चर्चा बाकी आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपला मात देण्यासाठी मोठे पक्ष एकत्र आले आहेत. 2019 ला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी 230-240 जागांची आवश्यकता असेल. एवढ्या जागा न मिळाल्यास एनडीएच्या अडचणी वाढू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement