एक्स्प्लोर

कानपूर रेल्वे अपघाताच्या सूत्रधाराला नेपाळहून अटक

नवी दिल्ली: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे दहशतवादी हात होता का? अशी शंका अजून दाट होते आहे. कारण, या प्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एजंटला अटक केली गेली. शमशुल हुडा असं अटकेत घेण्यात आलेल्या एजंटचं नाव आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आलीय. 20 नोव्हेंबर 2016 ला कानपूरजवळच्या पोखरायाजवळ पटना-इंदूर एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले होते. ज्यात 150 लोकांचा मृत्यू झाला. मात्र, रेल्वे रुळ सुरक्षित असताना हा अपघात घडलाच कसा? असा प्रश्न सातत्याने उपस्थीत केला जात होता. आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती या दुर्घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शंका बळावली आहे. सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि एनआयएकडून शमशुल हुडाची चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरणी अजून तीनजाणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांची ओळखही पटली आहे. या तीन संशयितांमध्ये किशोर गिरी, आशिष सिंह आणि उमेश कुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण नेपाळच्या दक्षिण भागाचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हुडा हा नेपाळच्या बारा जिल्ह्यातील हत्याकांडप्रकरणाचाही प्रमुख सूत्रधार आहे. तर बिहार पोलिसांनी सांगितले की, हुडासह ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांना हुडाच्या सहकाऱ्याने तीन लाख रुपये दिले. पोलीस महासंचालक पशुपती उपाध्याय यांनी सांगितले की, ''हुडाचे आंतरराष्ट्रीय संघटनांशीही संबंध असून, तो नेपाळ आणि भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्याविरोधात बारा जिल्हा सत्र न्यायालयात याआधीच एक खटला सुरु आहे.'' बिहार पोलिसांनी जानेवारीमध्ये तीन आरोपींना अटक करुन, भारतीय रेल्वेला लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे असल्याचा दावा केला होता. यासाठी ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनांना मदत करत होते. त्यामुळे कानपुर रेल्वे अपघातात आयएसआयची काय भूमिका होती, याचा तपास सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget