PM Modi Gujarat Visit: आजपासून PM मोदींचा 2 दिवसीय गुजरात दौरा, 15,670 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन
PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यातील हा दुसरा गुजरात दौरा आहे. आज गुजरातमधील 15,670 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करणार आहेत.
![PM Modi Gujarat Visit: आजपासून PM मोदींचा 2 दिवसीय गुजरात दौरा, 15,670 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन prime minister narendra modi two days gujarat tour start today marathi news PM Modi Gujarat Visit: आजपासून PM मोदींचा 2 दिवसीय गुजरात दौरा, 15,670 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/16/871374a35098d5dcbf716756d6bc7f73166588884457825_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Narendra Modi in Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर (Gujarat) असतील, पंतप्रधान आज गुजरातमधील 15,670 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलंय, दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गांधीनगर, जुनागड, राजकोट, केवडिया आणि व्यारा या शहरांना भेट देतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यातील हा दुसरा गुजरात दौरा आहे.
पंतप्रधानांचा असा असेल कार्यक्रम
पंतप्रधान आज सकाळी 9.45 वाजता गांधीनगरमध्ये डिफेन्स एक्सपो-२२ चे उद्घाटन करतील. त्यानंतर अडालज येथील मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सचे दुपारी 12 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता ते जुनागडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. संध्याकाळी 6 वाजता, ते इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह 2022 चे उद्घाटन करतील आणि राजकोटमधील अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर 7:20 वाजता, पंतप्रधान राजकोटमधील प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
राजकोटमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन
राजकोटमध्ये एका प्रदर्शनाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पीएमओने सांगितले की, गुरुवारी मोदी केवडियामध्ये मिशन लाइफ लाँच करतील. ते 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहतील आणि त्यानंतर व्यारा येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. या कार्यक्रमात 200 हून अधिक तंत्रज्ञान प्रदाते सहभागी होऊन त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमामुळे लोकांना त्यांचे तंत्रज्ञान दाखवण्याची संधी मिळणार आहे. हे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान साधन आणि प्रक्रियांसाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान करेल.
रक्षा प्रदर्शनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
गांधीनगरमध्ये 22व्या रक्षा प्रदर्शनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 'पाथ टू प्राइड' या थीमखाली आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोमध्ये आतापर्यंत आयोजित भारतीय संरक्षण प्रदर्शनातील सर्वात मोठा सहभाग पाहायला मिळणार आहे. ज्यात परदेशी OEM च्या भारतीय उपकंपन्या, भारतात नोंदणीकृत कंपनीचा विभाग, भारतीय कंपनीसह संयुक्त उपक्रम असलेले प्रदर्शक यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम भारतीय संरक्षण उत्पादन कौशल्याची विस्तृत व्याप्ती आणि प्रमाण दर्शवेल
20 तारखेलाही अनेक कार्यक्रम
20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:45 वाजता पंतप्रधान केवडिया येथे मिशन लाइफचा शुभारंभ करतील. दुपारी 12 वाजता पंतप्रधान केवडिया येथे मिशन प्रमुखांच्या 10 व्या परिषदेला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.45 वाजता ते व्यारा येथे विविध विकास उपक्रमांचे भूमिपूजन करतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)