एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केदारनाथला जाणं हे माझं भाग्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर हरिद्वारला रामदेव बाबांच्या पतंजली योगपिठाला भेट दिली. इथं मोदींनी रामदेव बाबांच्या पतंजली रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 'केदारनाथला जाणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.’
मोदी म्हणाले की, 'आज योगगुरु रामदेव बाबांनी मला राष्ट्रऋषिचा मान देऊन माझी जबाबदारी वाढवली आहे. त्यांनी मला आज सरप्राइज दिलं.' पुढं मोदी असंही म्हणाले की, 'मला स्वत:वर जेवढा विश्वास नाही, तेवढा विश्वास जनतेच्या आशीर्वादावर आहे.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं केदारनाथला दाखल झाले. त्यानंतर मोदींनी केदारनाथच्या मंदिरात रुद्राभिषेक केला. केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मोदींनी भाविकांशीही संवाद साधला. मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी यावेळी भाविकांचीही चांगलीच झुंबड उडाली.
मोदी देशातील पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांच्या दर्शनानंतर केदारनाथचं दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. महाप्रलयाच्या ३ वर्षानंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये इतका जंगी सोहळा झाला. पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच मोदी केदारधामला पोहोचले. या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी केदारधामला गेल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
निवडणूक
करमणूक
Advertisement