PM Modi Speech: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीएचा (NDA) विजय होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे. एनडीएच्या सत्तेच्या तिसऱ्या कालावधीमध्ये भारत (India) हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच भारत लवकरच विकसित देशांच्या यादीमध्ये सामील होणार असल्याचं वक्तव्य देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  बुधवारी (26 जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या प्रगती मैदानावर जागतिक संमलेन आणि प्रदर्शन केंद्र भारत मंडपमचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. 


सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-20 परिषदेचे यजमानपद हे भारताकडे आहे. त्यासाठी दिल्लीच्या प्रगती मैदानावर या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. 123 एकरांवर पसरलेल्या या परिसराला भारत मंडपम हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने नऊ वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांवरदेखील निशाणा साधला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात काय म्हटलं?


जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की, 2014 मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. पण आता अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर देशाची पाचव्या स्थानावर भारताची अर्थव्यवस्था आहे. तसेच त्यांनी 13.5 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढणार असल्याचं देखील वक्तव्य केलं आहे. 


भारताला आपण एक विकसित राष्ट्र बनवणार आहोत, जे आधी राष्ट्र आणि नागरिक या सिद्धांतांवर काम करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटंल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या INDIA वर देखील हल्लाबोल केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, काही लोकांना सवय असते चांगल्या गोष्टींवर टीका करण्याची. तसेच राज पथाचे नाव कर्तव्य पक्ष करताना विरोधी पक्षांनी कशा प्रकारे विरोध केला याबाबत देखील पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


पण जेव्हा कर्तव्य पथ तयार झाला तेव्हा विरोधकांनी देखील त्याचं कौतुकं केलं,असं पंतप्रधानांनी म्हटंल आहे. त्यामुळे भारत मंडपमचं देखील विरोधक अशाच प्रकारे कौतुक करतील असा विश्वास देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच नकारात्मक विचारवंतांनी भारत मंडपम हा प्रकल्प रखडवण्याचा प्रयत्न केला पण आज भारत मंडपम पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटंल आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PM Kisan Yojana : PM किसानचा 14 वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार