New Parliament Building Inauguration:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (28 मे) रोजी सकाळी नव्या संसद भवनाचं (New Parliament Building) उद्घाटन केलं. नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधांनी राजदंडाला वैदिक पद्धतीने आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात राजदंडाला साष्टांग दंडवत घातलं. त्यानंतर त्यांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं आणि सर्वधर्मीय प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये मोदींनी या सोहळ्याबद्दलचा आनंदही व्यक्त केला आहे. 


उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ट्वीटद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "आजचा दिवस हा संपूर्ण देशवासीयांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानानं आणि आशेनं भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ही भव्य आणि दिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धीला आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल." 






नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील महत्त्वाच्या बाबी



  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.25 नव्या संसद भवनात पोहचले, इथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. 

  • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सोबत ते पूजेच्या ठिकाणी गेले जिथे त्यांचे तोरण दरवाज्यावर पुजारींकडून स्वागत करण्यात आले. 

  • पंतप्रधान पोहचल्यानंतर तमिळनाडूमधून आलेल्या 18 मठाच्या महतांनी फुलं, पाणी आणि इतर वैदिक पद्धतींनी राजदंडाची स्थापना केली. 

  • पंतप्रधान मोदींनी त्यानंतर लोकसभा अध्यक्षांसोबत यज्ञविधींमध्ये सनातन परंपरेनुसार एकूण नऊ आहुत्या दिल्या.  

  • त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदंडाला साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर सगळ्या मंहंतांसोबत संसद भवनात प्रवेश करुन अध्यक्षांच्या खुर्चीजवळ राजदंडाची स्थापना केली. 

  • राजदंडाच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वधर्मीय प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये जाऊन सर्व खासदारांसोबत सावरकरांना श्रद्धांजली वाहिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi Speech : नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी