Mann Ki Baat:  आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे प्रसारण होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधतात. आज या कार्यक्रमाचा 101वा भाग प्रसारित करण्यात आला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 मे) रोजी मन की बातमधून देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, "जेव्हा 'मन की बात' या कार्यक्रमाच्या शंभाराव्या भागाचे प्रसारण झाले त्यावेळी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या वेळा होत्या, कुठे संध्याकाळ होती तर कुठे मध्यरात्र होती. पण तरीही मोठ्या प्रमाणात 'मन की बात' या कार्यक्रमाचा 100वा भाग लोकांनी ऐकण्यासाठी वेळ काढला." तसेच, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद देखील व्यक्त केला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, "मन की बात'च्या मागील भागात काशी तमिळ संगमाचा विषय झाला. तसेच सौराष्ट्र तमिळ संगमाविषयी देखील चर्चा करण्यात आली. तसेच काही काळाआधी वाराणसीमध्ये काशी तेलुगू यांचा देखील संगम झाला. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी असाच एक अनोखा प्रयत्न देशात करण्यात आला आहे. तो प्रयत्न युवा संगमाचा आहे." 


युवा संगम कार्यक्रमाची 'मन की बात'मध्ये चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात आजच्या भागात युवा संगम या कार्यक्रमाविषयी चर्चा केली. तसेच त्यांनी युवा संगम या कार्यक्रमाविषयी चर्चा करताना काही तरुणांशी देखील संवाद साधला. यादरम्यान अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुम या विद्यार्थ्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी युवा संगम या कार्यक्रमावार त्याला ब्लॉग लिहिण्याचा सल्ला देत स्वत:चे अनुभव सांगण्यास सांगितले. 


पंतप्रधानांचा जपान दौऱ्याचा उल्लेख


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी त्यांच्या जपान दौऱ्याचा देखील उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले की, "काही दिवसांपूर्वी मी जपानच्या दौऱ्यावर गेलो होतो आणि तिथे मला हिरोशिमामधील पीस मेमोरिअलमध्ये जाण्याची संधी मिळाली. हा एक भावनिक क्षण होता. जेव्हा आपण इतिहासातील गोष्टींची जपवणूक करतो तेव्हा पुढील पिढीला त्या गोष्टी खूप मदत करतात." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


New Parliament Building Inauguration : पंतप्रधान मोदींचा राजदंडाला दंडवत, नव्या संसदेत राजदंड स्थापित